द फाउंटनहेड या कादंबरीतील हा एक फार बोलका परिच्छेद. व्यक्तीस्वातंत्र्य हिसकावून घेऊन हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नातला एक विद्वान एल्सवर्थ टूही आपलं मनोगत व्यक्त करतो आहे...
जे चाललं आहे जगात आजवर ईशवाद, धर्मवाद किंवा एकसंध विचारप्रणालींचा वर्चस्ववाद याबाबत सावध करणारं हे मनोगत.
"माणसाकडे एक अस्त्र आहे. विवेकाचं. त्यामुळे ते त्याच्याकडून काढून घेणं हे महत्त्वाचं. विवेकाचे आधारच काढून घ्यायचे. काळजीपूर्वक हं... तो अगदीच नाकारूनही चालत नाहीत. काहीही पूर्णपणे नाकारून चालत नाही, नाहीतर मग हातचा डाव जातो. विवेकविचार म्हणजे पाप नाही ठरवून चालत... काहींनी तेही करून झालंय म्हणा... आणि यशस्वीही झाले ते. पण तरीही आधुनिक जगात आपण एवढंच म्हटलेलं पुरे असतं... की विवेकनिष्ठेला मर्यादा असतात. त्यापलिकडेही काहीतरी आहे म्हणायचं. काय? काहीही स्पष्ट करण्याची गरज नसते. त्यापलिकडे काहीही कितीही असू शकतं... ’अंतःप्रेरणा’- ’भावना’- ’साक्षात्कार’-’अंतर्ज्ञान’- ’द्वंद्वात्मक पदार्थवाद’. कुठेतरी एखाद्या गुंतागुंतीच्या मुद्द्यात अडकलात आणि कुणी सांगितलं की तुमच्या तत्वांना काही अर्थ नाही- तर काय आपण तयारच असलं पाहिजे... आपण सांगून द्यायचं की रूढ अर्थांच्या पलिकडेही काहीतरी असतं. केवळ विचार न करता थोडं महत्त्व भावभावनांनाही द्यायला हवं. थोडी श्रध्दा हवी. विवेक खुंटीला टांगला की एक जोकर वापरता येतो. तुम्हाला जे हवं ते बोलू शकता तुम्ही. गरजेनुसार बदल करू शकता आपल्या युक्तीवादात. तुमच्या घोळात अडकतोच तो. विचारी माणसांवर राज्य करता येईल कां कुणाला? आम्हाला विचारी माणसंच नको आहेत.”

No comments:
Post a Comment