Sunday, September 19, 2010

ब्लॉग बंद

बंद करणार आहे हा ब्लॉग. गणपतीच्या काळात बुध्दी या गोष्टीच्या संपूर्ण विटंबनेनंतर कशाबद्दल काही लिहावसं वाटत नाही...
त्यात भर पडली आहे त्या कोपनहेगनच्या मुलीची... तिला भारतातून सूचना करकरून संस्कृती जपण्याची कर्मकांडे करायला भाग पाडून वैताग आणणारे नातेवाईक आता तिच्या कोपनहेगनच्या घरातच पोहोचले आहेत. दोन-दोन तास देवासमोर बसणे हा त्यांच्या नैतिकतेचा परमोच्च बिंदू आहे. त्यावर विरोध व्यक्त केल्यानंतर आणि आणखी काही गोष्टी मनाविरुध्द झाल्यानंतर सासूबाईंच्या अंगात देवी आली... कोपनहेगनमध्ये.
देवदेव्या आणि तत्संबंधी कर्मकांडे आता आपल्या प्रादेशिक भाषांच्या माध्यमांतून एवढी बोकाळली आहेत की उगीच हे मिणमिण लिखाण काय करणार.
शिवाय बुध्दीजीवींची बुध्दीवंतांची भलीमोठी फौज आपल्याकडे आपल्या श्रध्दांबद्दल उदात्तीकरणाचीच भाषा बोलत असताना- आपल्याकडे स्टीफन हॉकिंग, रिचर्ड डॉकिन्स सबकी ऐशीतैशीच होणार.
तिथे मुग्धा कर्णिकचा काय पाड.
माझ्या भरवशाच्या नास्तिक मित्रांनीही यासंबंधी काहीही लिहित रहाण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.
आता बस्स्स...

No comments:

Post a Comment