माझा लाडका विचारवंत उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि नास्तिकतेचा वैचारिक मंच धडाडीने उभारणारा रिचर्ड डॉकिन्स याला अभिवादन करून मी आज हा नवा वेब्लॉग सुरू करीत आहे. आपल्यात अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सव या सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो.
देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून आपल्यापैकी अनेकजण मनातल्या मनात चडफडत या गोष्टी करीत असतात. यात एक भीतीही असते... बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची.
रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, धैर्य दाखवून एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित् जास्तच भरेल. पण ही सारी सायलेन्ट मेजॉरिटी आहे, म्हणून ती मायनॉरिटी वाटते. भारताच्या संदर्भात हे विधान म्हणजे जरा अतीच आशावादी ठरेल.
बाबावाक्यम् प्रमाणम् ही वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असावी असं आपले उत्सवी गोंधळ पाहून तरी वाटतं.
आधुनिक भौतिक प्रगतीला मानवी आध्यात्मिक प्रगतीतले हीण ठरवून या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेतघेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, हिमालयातील जपतपांतून आज आपण वापरतो त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार झाले नसते. कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसलं यश येतं... पण तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपला बिस्तरा पसरत नेला आहे. तर्कशुध्द विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या आपल्या शिक्षणपध्दतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होणार नाही.
एक उपाय मला सुचतो. छोटी सुरुवात असेल कदाचित पण अशी हिंमत असलेल्या नास्तिकांनी, विवेकनिष्ठांनी एकत्र आले पाहिजे. धर्मसंघटने असतात, पंथसंघटने असतात, देवळं-मशिदी-चर्च मंडळींची संस्थाने असतात, कुठल्याही फुटकळ महाराज-बाबा-बापू- माँ- अम्मांचे बिल्ले लावलेले ताफे असतात- आपल्यासारख्या लोकांचा एकतरी फोरम आहे? आपण आळशी आहोत की भित्रे- असा प्रश्न पडावा.
या जगात अनेक देशांतून, आपल्याच देशाच्या विज्ञानसंस्थांतूनही जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध लागण्याची गती अनेकपटींनी वाढलेली असताना आपल्या भोवती जो देवधर्मोद्भव अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत. नुसतेच छद्मी हसणार?! खाजगीत टर उडवणार?! आणि मग आपण हे बदलू शकत नाही... अहो शतकानुशतकांच्या परंपरा आहेत या... कशा बदलणार... जाऊं द्या म्हणून गप्प बसणार?!
विवेकनिष्ठेचा आंतराग्नि फुंकर घालताच फुलू शकतो.
कोणत्याही राजकीय तत्वप्रणालीचा झेंडा खांद्यावर न घेता हे करणे आवश्यक आहे.
भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचाच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे. विश्वासावर आधारित असलेला, पुराव्यावर आधारित नसलेला कोणताही दावा-अर्थात श्रध्दा म्हणजे अंधश्रध्दाच असते. हे मत मान्य असलेल्या सर्वांचे हे व्यासपीठ व्हावे.
केवळ लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन तरूण मुलामुलींपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठी भाषक मुलेमुली इंग्रजीतले विचार वाचायला अजूनही बिचकतात. भाषेमुळे ज्ञानही परके होते. म्हणून आपले विचार आपल्या भाषेतून. डॉकिन्स, रसेल, हिचिन्सन, डेनेट... साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून. लिहायचे. मांडायचे. पोहोचवायचे.
हे एक कन्व्हर्जन आपल्याला करायलाच हवं.
अनेक लोक 'दुख में चिंतन सब करें, सुख में करे न कोई' या कबिरच्या डोह्याप्र्माणे वागतात. गरजेप्रमाणे देव व त्याच्यावरील श्रद्धा. मी अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, लहान, मोठे, यांना आपण लिहिल्याप्रमाणे छद्मी हसतांना पाहिलंय. पण आता यातलेच काही लोक देवाचे आणि साधू, बाबांचे भक्त झाले आहेत. जरा आयुष्याचे फासे उलटे पडले की आम्ही सर्व शक्ती, बळ, आत्मविश्वास हरवून बसतो. एका माझ्या मित्राची तर कोण्या एका बाबावर एवढी भक्ती जडली आहे की त्याने आपल्या फंडातून कर्ज काढून त्याच्यासाठी फिल्म बनवून दिली. मी मैत्रीची शपथ दिल्यावरच त्याने निदान खर्च तरी मागून घेतला. पण तरी सुध्द्धा, माझ्या मते जोपर्यंत लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्यांच्यापुरत्या असतात, त्याचा कुणाला त्रास होत नाही तो पर्यंत ज्याचा त्याचा प्रश्न असावा. आज आपल्याला गरज आहे ती श्रद्धा निर्मुलनेपेक्षा श्रद्धेची दिशा वळविण्याची. आज समाजात स्वतःवर, स्वतःच्या कामावर आणि कर्तृत्वावर श्रद्धा आणि विश्वास हरवून बसलेले अनेक लोक पहायला मिळतात. जर काही लोकांना देव-धर्म पाळून, पूजा अर्चा करून मानसिक शांती मिळत असेल, तर काही हरकत नसावी. पण या फोरम तर्फे जर या श्रद्धेला योग्य दिशा देता आली तर उत्तम.
ReplyDeleteआजचाच अनुभव सांगतो. माझ्या एका लेक्चरची सांगता मी रामायण आणि महाभारत हे उत्तम ग्रंथ आहेत, उत्तम व्यक्तिचित्रण आणि अफलातून विस्युअलाइज केलेले प्रसंग असलेले स्क्रिप्ट आहे. भागवत गीता आयुष्याचा उपदेश करणारे एक अत्युत्तम असे काव्य आहे, असे म्हणून केली. आता मी माझ्या विद्यार्थ्यांकडे आपण जे महाभारत व रामायण वाचतो, ते ग्रंथ वाल्मिकी आणि व्यासांनी लिहिले आहे, याचे प्रूफ पुढच्या लेक्चरला घेउन यायला सांगितला आहे. कम्युनिकेशन थिअरीच्या लेक्चरचा हा एक भाग आहे. तरुण पिढीला असेच चेलेन्जेस देऊन त्यांना विचार करायला लावायचा एक प्रयत्न.
तुमचा ब्लॉग पाहिला, आवडला आणि जरूर वेळ काढून मी वाचते. प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया द्यायला जमेलच असं नाही. डॉकिन्सचं एकच पुस्तक मी (अर्धवट) वाचलं आहे, द गॉड डिल्यूजन. पण उत्सुकता वाढलेली आहेच.
ReplyDeleteतुम्ही बर्ट्रांड रसलचं 'सायन्स अँड रिलिजन' वाचलं आहेत का? रसलची आणखीही पुस्तकं खूप तडाखेबंद आहेत, उदा: मॅरेज अँड मॉरल्स, कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपिनेस.
तुम्ही त्याहीबद्दल लिहा अशी "मागणी" आहे.
we are neither lazy nor frightened ....we just don't care...._khangar.nikhil@gmail.com
ReplyDeleteI have always believed that `Mystery' like `Good'/'Evil' spirits (even like`magic') is an unknown truth! What we observe in the name of religion is nothing beyond Man's way to make peace with it, in a collective way..to appease/cajole/even 'bribe' it, the way we feel is right, to beg for some favours..which can, if at all, give you some mental peace for having followed something as the community does..but nothing more than that, if you do not enjoy the rituals for any reason!
ReplyDeleteFaith in any thing, is an unreasonable trust, but can offer its own psychological rewards ..like the 'bliss' of ignorance..but not far beyond!
One has to decide what should be the foundation of his/her life based on what one is comfortable with - a `stark truth' based on scientific facts which can some times be very unsettling, despite being exhilarating or some faith, without any logical reasoning (more of an escapist route), to lead life!
Unfortunately, all our religions are redundant now, as they were meant for a certain era in the past and are no more compatible with our present day compulsions/life styles. They badly need drastic updation in the light of scientific facts/ today's life!
A majority of us educated people may agree to all this, but may not like to change anything for several reasons including inertia, fear of opposition/facing truth,lack of guts to accept our shortcomings,sheer force of habit,....!
Whatever the reasons be, the biggest drawback of the current dangerous trend is, if we ourselves do not follow the scientific truth and do not set examples for our young ones to follow, our future generations will be much worse in reasoning power and far less prepared to face their future in a rational way.
Well said, Arun.I understand, that people who have no way of understanding the physical nature of our surroundings and even ourselves, may fall for these defence mechanisms, psychological supports. I wouldn't even disturb them in their primitive thinking. Let them be. The problem arises, when people of science and other intellectual persuasions refuse to think further and follow the routine.
ReplyDeleteWhen a doctor says- I have done what I could- now its Gods will. that is an intellectual felony, laziness or a plain escape route from taking responsibility of your own action. The God concept has become an escape route for so many things in our developmental processes.
True, when the Doc says its God's will, he is surrendering to the yet unknown facts of life and accepting limitations of his knowledge! Come to think of it, TB/leprosy were once considered incurable and even assumed to be result of one's Karma :( !
ReplyDeleteI have seen lot many people working in the field of science/ engineering (even Bhatnagar awardees)having`faith' in `muhurt'/Babas/Karma..It just goes to say they are following Science for earning their livelihood/material sucess and do not believe in what they followed(mugged up?) for their success in scientific fields. There are several such 'schizophrenics' in the society occupying high offices and misleading scores of others who follow them for various reasons!
The 'God' concept has a possible utility only if it can stop the unfairness in the daily happenings..but the corruption levels in society go to disprove that too..probably, the skewed/unreasonable thinking that supports unscientific things also plays a part even here leading to general insensitivity!
Yes Arun, and therefore the question is-what is the use of a delusional concept that doesn't even guarantee or has failed to ensure justice and virtue.
ReplyDelete